मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला लाजवेल एवढे सस्पेन्स आणि ट्विस्ट राज्यातील राजकारणात पाहायला मिळाले आणि अजूनही मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणाची सूत्रे ही दिल्लीतून हलवली जात आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार न केल्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ही टीका अजूनही सुरूच आहे. त्याचमुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात शिंदेंबरोबर देवेंद्र फडणवीसही जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे आणि फडणवीसांनी सरकार स्थापनेनंतर दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. असाच दौरा ते आजही करणार आहेत. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करायचा असल्याने वरिष्ठांची चर्चा करण्यासाठी हा दौरा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार झालेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Rohit Pawar : ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची स्थगिती उठवा; रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- IND vs ENG : ऋषभ पंतने सामनावीर म्हणुन भेटलेले ‘हे’ खास बक्षीस दिलं रवी शास्त्रींना; पाहा VIDEO!
- Maharashtra Bus Accident In MP | बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या! – अमोल मिटकरी
- Ramdas kadam : सेनेला पुन्हा धक्का, रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा
- CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

