मुंबई : भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांच्या नेतृत्वशैलीत काही गोष्टी एकसमान आहेत. असे भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा म्हणाला आहे. ओझाने म्हटले की, रोहित आणि धोनी दोघेही गोलंदाजांना योग्यरीत्या पाठिंबा देतात. त्यामुळे गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा पराभव करत एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. यापूर्वी २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला त्याच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले होते. आता या मालिका विजयामुळे रोहितने धोनीच्या यशाची बरोबरी केली आहे.
भारताने इंग्लंडविरुध्द एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर ओझाला विचारण्यात आले की, धोनी आणि रोहितच्या कर्णधारपदामध्ये काही साम्य आहे का? क्रिकबझवरील चर्चेदरम्यान ओझा म्हणाला की,”धोनी आणि रोहित यांच्या नेतृत्वशैलीत काही गोष्टींमध्ये साम्य आहे. कर्णधाराकडून आत्मविश्वास मिळाल्यास गोलंदाज चांगली कामगिरी करतो. कर्णधाराने गोलंदाजाला साथ दिली नाही तर तो कधी कधी मध्येच हरवलेला दिसतो. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी अनेकदा सांगितले आहे की रोहित त्यांना पाठिंबा आणि आत्मविश्वास देतो. हार्दिक पंड्या देखील रोहितला पाठिंबा देण्याचे श्रेय देतो आणि त्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो. सर्व यशस्वी कर्णधारांमध्ये ही एक समानता राहिलेली आहे.”
प्रज्ञान ओझाने पुढे म्हणाला की,”फलंदाज स्वतःचे नशीब लिहितात म्हणजे फलंदाजी करणे पूर्णपणे त्याच्याच हातात असते. पण गोलंदाजांचा विचार केला तर त्यांचे नशीब कर्णधाराच्या हातात असते. जेव्हा एखादा वरिष्ठ खेळाडू किंवा कर्णधार मैदानावर तुमची साथ देतो, तेव्हा तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो.” असेही ओझा म्हणाला.
भारतीय संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम खेळताना इंग्लंडचा संघ ४५.५ षटकांत २५९ धावा करून बाद झाला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून सामना जिंकला. सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानेदेखील दमदार कामगिरी केली. पंड्याने त्याच्या नावाला साजेशी अष्टपैलू खेळी केली. त्याने गोलंदाजी करताना २४ धावांत ४ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना ७१ धावांची तुफानी खेळी खेळली.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | संजय राऊत हाजीर हो..! मुंबई न्यायालयाचे निर्देश
- Bus accident in Indore : गिरीश महाजन मध्य प्रदेशला रवाना; उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- Eknath Shinde | मंत्रीमंडळ विस्ताराची सूत्र दिल्लीतून हलणार; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार
- Ramdas kadam : ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करतोय; रामदास कदमांनी व्यक्त केली खंत
- IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा भीमपराक्रम, ऋषभ पंतच्या नावावरही नव्या विक्रमाची नोंद


