🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये बुधवारी अचानक अशा बातम्या जोर धरू लागल्या होत्या. गांगुली कर्णधार लीजेंड लीग क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतात, असे वृत्त होते. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंमध्ये खेळली जाते. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना गांगुलींनी आपण कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गांगुलींनी पीटीआयशी बोलताना, त्यांच्या लीजेंड लीग क्रिकेटमध्ये खेळणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की ते कोणत्याही लीजेंड लीगचा भाग असणार नाहीत. मात्र विशेष म्हणजे, याबाबत माहिती देताना विस्डेनने भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक सलामीवीर दोघांचा फोटो शेअर केला आहे. व त्यामध्ये सहा धावा करणाऱ्या जोडीची मैदानावर फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहोत, असे लिहिले आहे.
यावर्षी सप्टेंबरमध्ये या स्पर्धेची दुसरा हंगाम आयोजित करण्याचे नियोजन आहे. भारतीय दिग्गज हरभजन सिंग, पार्थिव पटेल यांच्याशिवाय नुकताच निवृत्त झालेला इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गननेही या स्पर्धेत भाग घेण्यास होकार दिला आहे. भारताकडून प्रग्यान ओझा, रतिंदर सिंग सोधी आणि अशोक दिंडा यांनी यावेळच्या स्पर्धेसाठी इच्छुक असल्याची माहिती दिली आहे.
लिजेंड लीग क्रिकेट स्पर्धेची पहिली आवृत्ती ओमानमध्ये खेळली गेली होती. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची तीन संघांमध्ये विभागणी करण्यात आली होती. तिन्ही संघ भारत, आशिया आणि उर्वरित जग अशा नावांनी मैदानात खेळायला उतरले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Pratap Sarnaik : ठाणे आणि मिरभाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी दिले – प्रताप सरनाईक
- Viral Video : हॉटेलमध्ये नाना पटोलेंच्या खांद्यावर महिलेचं डोकं असलेला व्हिडीओ, चित्रा वाघ यांचं ट्विट
- Ben Stokes : बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर रवी शास्त्रींनी खेळाडूंच्या तणावाबाबत काढला नवा फॉर्म्युला, म्हणाले…!
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचे श्रेय महाविकास आघाडीचे – जयंत पाटील
- Hardik Pandya : “हार्दिक पंड्याला २ वर्षांसाठी संघाबाहेर ठेवणे हा…”, शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
