Share

Asia Cup 2022 : शिष्याला बघून आठवेल गुरू…धोनीची आठवण करून देणारा रिषभ पंतचा हेलिकॉप्टर शॉट!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आशिया चषक 2022 मध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय क्रिकेट संघ 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी नेटमध्ये खूप घाम गाळला. दरम्यान, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने नेटमध्ये मोठे फटके मारले, ज्यामध्ये हेलिकॉप्टर शॉटचा समावेश होता.

पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो मोठे शॉट्स मारण्याचा सराव करत आहे. दरम्यान, दीपक चहरच्या चेंडूवर त्याने हेलिकॉप्टर शॉट मारला. याशिवाय त्याने आपल्या ओळखीच्या शैलीत एका हाताने मोठा फटकाही मारला. व्हिडीओ पाहून हे स्पष्ट होते की चेंडू पंतच्या बॅटला चांगला जोडला जात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “Good day at the office”.

https://www.instagram.com/reel/ChuVCOxp722/?utm_source=ig_web_copy_link

पंतशिवाय दिनेश कार्तिकचाही समावेश-

आशिया चषकासाठी भारतीय संघात पंतशिवाय दिनेश कार्तिकचाही समावेश आहे. कार्तिकही काही काळापासून एक चांगला मॅच फिनिशर असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत दुबईत होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन कोणावर विश्वास ठेवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सबा करीम यांचा पंतवर विश्वास –

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक या दोघांना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळायला हवे, असे माजी भारतीय निवड समिती सदस्य सबा करीम यांना वाटते आणि त्यांनी पंतवर विश्वास दाखवला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!