मुंबई: मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. तर भाजपचे नेते गिरिश महाजन यांना मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तर गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवण्यात आले असून या बचाव मोहिमेसाठी मदत करावी, असे त्यांना सांगितले आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये- एकनाथ शिंदे
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
दरम्यान खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- Ramdas kadam : ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करतोय; रामदास कदमांनी व्यक्त केली खंत
- IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा भीमपराक्रम, ऋषभ पंतच्या नावावरही नव्या विक्रमाची नोंद
- Rohit Pawar : ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची स्थगिती उठवा; रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- IND vs ENG : ऋषभ पंतने सामनावीर म्हणुन भेटलेले ‘हे’ खास बक्षीस दिलं रवी शास्त्रींना; पाहा VIDEO!
- Maharashtra Bus Accident In MP | बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या! – अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

