Ramdas kadam । मुंबई : माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी पात्र पाठवलं आहे. या पत्रात रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे की, “२०१९ साली आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात, त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं.”
राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करू नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल, अशी विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचंही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे, असं सांगत रामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, पुढे याच पत्रात कदम म्हणतात, मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटं आली, त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे, असंही कदम यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | संजय राऊत हाजीर हो..! मुंबई न्यायालयाचे निर्देश
- Bus accident in Indore : गिरीश महाजन मध्य प्रदेशला रवाना; उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- Eknath Shinde | मंत्रीमंडळ विस्ताराची सूत्र दिल्लीतून हलणार; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार
- Ramdas kadam : ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करतोय; रामदास कदमांनी व्यक्त केली खंत
- IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा भीमपराक्रम, ऋषभ पंतच्या नावावरही नव्या विक्रमाची नोंद


