🕒 1 min read
मुंबई : जसप्रीत बुमराहला पहिल्यांदाच भारतीय संघाच्या कर्णधार पदाची कमान मिळणार आहे. १ जुलैपासून एजबॅस्टन येथे होणार्या इंग्लंड विरुद्ध भारत (IND vs ENG) कसोटीत तो कर्णधार पदाची सूत्रे हाती घेऊ शकतो. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारतीय संघासाठी कपिल देव यांच्यानंतर बुमराह हा कर्णधारपद भूषवणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे. कपिल देवने अखेरची १९८७ मध्ये संघाचे कर्णधारपद भूषविले होते. म्हणजेच ३५ वर्षांनंतर हा योगायोग घडला आहे. बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिल्यांदाच ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याला आयर्लंडविरुद्ध कर्णधारपदाची संधी मिळाली होती.
जसप्रीत बुमराहच्या क्रिकेटमध्ये पदार्पणाची कहाणी बहुतेक खेळाडूंप्रमाणेच संघर्षाची आहे. तो ५ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. मुंबई इंडियन्सशी बोलताना त्याची आई दलजीत बुमराहने सांगितले की, अनेकदा मी दुपारी झोपायचे. पण तो मला खूप त्रास द्यायचा. त्याने चेंडूने खूप त्रास दिला आहे. यादरम्यान जसप्रीत बुमराह म्हणाला की, माझ्याकडे फक्त एक जोड शूज आणि फक्त एक जोडी टी-शर्ट होते. मी ते धुवून पुन्हा पुन्हा वापरायचो. तुम्ही लहान असताना अशा कथा ऐकता. हे बर्याच लोकांसोबत घडते आणि मी प्रत्यक्षात या टप्प्यातून गेलो आहे.
दिलजीत बुमराह म्हणाल्या की, जेव्हा मी त्याला टीव्हीवर पहिल्यांदा आयपीएल खेळताना पाहिलं तेव्हा मी रडायला लागलो. त्याने मला आर्थिक आणि शारीरिक संघर्ष करताना पाहिले आहे. जसप्रीत बुमराह म्हणतो की, अशा कठीण वेळा तुम्हाला मजबूत बनवतात. यानंतर त्याच्या आईने एक प्रसंग आठवला आणि सांगितले की, तिने एकदा बुट पाहिला, पण त्यावेळी आमच्याकडे ते विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. मग त्या बुटाकडे बघून तो म्हणाला की मी एक दिवस नक्की घेईन. आज त्याच्याकडे खूप सारे बुट आहेत.
“Talent can come from anywhere and reach the pinnacle of success.”
???? Watch the transformational journey of @Jaspritbumrah93 from a rookie to a world-beater ????#OneFamily #CricketMeriJaan #LeaderInSport #LeadersWeek #NitaAmbani @ril_foundation pic.twitter.com/hFUqvQnHSv
— Mumbai Indians (@mipaltan) October 9, 2019
२०१६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत २९ कसोटीत १२३ बळी घेतले आहेत. यामध्ये त्याने २ वेळा ४ बळी तर ८ वेळा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. २७ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने ७० एकदिवसीय सामन्यांमध्ये ११३ आणि ५७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६७ बळी घेतले आहेत. त्याचे एकूण टी-२० रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. बुमराहने २०७ सामन्यात २५३ बळी घेतले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २१० बळीही घेतलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
