मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एवढेच नाही तर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडले. आपल्याच लोकांनी दगा दिला, असे सांगत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. शिवसेनेतले एकून ३९ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. याचा मोठा फायदा भाजपला झाला. गेले ९ दिवस चाललेल्या या नाट्यात शिवसेनेला रोज नवीन धक्के बसले.
अडीच वर्षापूर्वी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन पक्ष सामील होते. या तीन्ही पक्षांना एकत्र आणण्यास खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. दरम्यान शिवसेनेतच फूट पडल्याने महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांनी भावनिक स्वरूपाच्या पोस्ट केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील एक सूचक ट्विट केले आहे. “शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केले आहे. हॅशटॅग मराठी , हॅशटॅग सुविचार असे हॅशटॅग वापरत रूपाली चाकणकर यांनी हे ट्विट केले आहे.
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत. #मराठी #सुविचार
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 30, 2022
उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या सय्यमाचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र शिवसैनिकांनी शांत राहण्याच आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. यामुळे कोणत्याही प्रकारचा गदारोळ राज्यात काल झाला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Sherlyn Chopra ; “अखेरीस…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शर्लिन चोप्राचे ट्विट चर्चेत
- Devendra Fadnavis and Eknath Shinde : आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार शपथ
- Rupali Thombare : “सत्ता येते ,जाते पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…” ; रूपाली ठोंबरे यांच ‘ते’ ट्विट चर्चेत
- Gajanan Kale: “तात्काळ ४०० शासन निर्णय काढणारा” ; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर गजानन काळेंची खोचक टीका
- Rohit Pawar : “अपना भी टाइम आएगा” ; उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर रोहित पवारांची FB POST
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

