Share

Nitesh Rane : संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटनंतर नितेश राणे म्हणाले ‘रिटर्न गिफ्ट’

Published On: 

मुंबई: आपल्याच पक्षातील नेत्यांनी मोठा धक्का देत शिवसेनेला मोठी जखम दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का पचवणे अत्यंत कठीण गेले. एकनाथ शिंदे यांनी बंडाला सुरुवात केली आणि एकापाठोपाठ अनेक नेत्यांनी सेनेशी पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणजे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले. “आपल्याच माणसांनी पाठीवर घाव देत पुढची पायरी गाठली”, अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळाली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हीच परिस्थिती अधोरेखित करणारे ट्वीट केले आहे.  यानंतर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

“रिटर्न गिफ्ट”, म्हणत नितेश राणे यांनी एक व्यंगचित्रही पोस्ट केले आहे. ज्यात २०१९ साली देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत शिवसेनेने बाण खुपसल्याचे दाखवण्यात आले आहे तर आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीत शिंदे यांनी बाण खुपसताना दाखवले. संजय राऊत यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरेंच्या पाठीत वार झाल्याचे एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. त्यालाच नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काल बहुमत चाचणी संदर्भात दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीने हा शपथविधी सोहळा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!