Share

IND vs ENG : सूर्याची तुफानी शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडचा १७ धावांनी विजय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज ३ सामन्याच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर १७ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने या टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारली. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने दमदार फलंदाजी करत भारतासमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तरात भारतीय संघाला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून फलंदाजीत सूर्यकुमार यादवने ११७ धावांची तुफानी शेतकी भारी खेळली. मात्र त्याची खेळी व्यर्थ गेली. भारताला या सामन्यात १७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

भारताचा डाव
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने दिलेल्या २१५ धावांचा पाठलाग करताना भारताला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून फलंदाजी सुरुवात करताना रोहित शर्मा आणि ऋषभ पंत ही जोडी अपयशी ठरली. विराटला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. विराट ११ धावांवरच बाद झाला. यानंतर फलंदाजी झालेल्या सूर्यकुमार यादवने आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सांभाळला. मात्र निर्णायक क्षणी श्रेयस अय्यर २८ भावांवर बाद झाला. मात्र भारताकडून सूर्यकुमार यादवने शेवटपर्यंत खिंड लढवली. सूर्यकुमारने ११७ भावांची शतकी खेळी केली. मात्र त्याला भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले. याव्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना रेसी टॉप्लीने ३ गडी बाद केले. डेव्हिड विली आणि क्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले. तर मोईन आली आणि रिचर्ड ग्लीसन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

इंग्लंडचा डाव
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने पहिल्यांदा दमदार फलंदाजी करत ११५ धावांचा बलाढ्य लक्ष्य भारतासमोर उभे केले होते. इंग्लंडकडून जेसेन रॉय आणि कर्णधार जोस बटलर यांनी डावाची सुरुवात केली. बटलर १८ धावांवर बाद झाला तर जेसन रॉय २७ धावा करून तंबूत परतला. इंग्लंड साठी यानंतर मात्र डेव्हिड मलान (७७ धावा) आणि लियम लिविंगस्टोन (४२ धावा) यांनी दमदार फलंदाजी केली. भारताकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेल आणि रवी विष्णू यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर आवेश खान आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!