Share

CM Eknath Shinde : आपल्याच माणासांनी आमच्यावर अनेक वार केले, आणि ते आम्ही झेलले – एकनाथ शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता राज्याच्या राज्यकारभाराचा गाडा हाकायला सुरुवात केली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पुकारलेला बंड आणि एकनाथ शिंदे गटात सामील होत असलेले पदाधिकारी व नेते हे अजूनही थांबलेल नाही. बंद करण्यामागचे कारण अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाची भूमिका असल्याचेच बोलून दाखवले आहे. आजही मुख्यमंत्र्यांनी बोलताना बंडाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सामान्य शिवसैनिकांना काय मिळाले असा सवालही उपस्थित केला. आपल्याच माणसांनी आमच्यावर वार केला आणि ते आम्ही सतत सहनही केले असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केली.

मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर असताना एका मेळाव्यात जनतेला संबोधित केले. आज पंढरपुरात असंख्य वारकरी भाविक आले होते. या सर्वांनी मला आनंदाने कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मला थेट जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद करायला आवडले. कसल्याही प्रकारची सुरक्षा न ठेवता मी थेट जनतेशी जाऊन त्यांच्यात संवाद साधला. इथे आपल्याच माणासांनी आमच्यावर अनेक वार केले. ते आम्ही झेलले. मला इतिहासात जायचे नाही. पण पंढरपूरमध्ये मला जे प्रेम मिळालं, ते मी कधीही विसरणार नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. हे वक्तव्य करताना शिंदे यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणा बाबत बोलले अशी शंका उपस्थित झाली आहे.

आम्ही महाराष्ट्रातून बाहेर गेल्यावर आमच्या वरती विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. आमच्या विषय वाईट भाषेचा वापर करण्यात आला. अनेकांनी आमच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले. तसेच आम्ही या सरकारमध्ये बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत. बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे इतर जातीय धर्मांचा द्वेष करणे असे नाही. तर सगळ्यांना सोबत घेऊन राज्याच्या विकास करणे असे आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!