Share

Narhari Zirwal : स्वतःविरुध्दची अविश्वास ठरावाची नोटीस का फेटाळून लावली; झिरवाळ म्हणाले…

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारे राजकीय भूकंप आला. या काळात एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांसह विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ हे देखील प्रचंड चर्चेत राहिले. झिरवाळ हे शिंदे गटाच्या विरोधात निर्णय घेत असल्याचे दिसतात शिंदे गटाने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस पाठवली होती. मात्र बंडखोर आमदारांच्या या नोटीसला जिरवा यांनी स्वतःच फेटाळून लावले होते. या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने झिरवाळ यांना तुमच्या विरुद्धच्या अर्जावर तुम्हीच कसे काय न्यायाधीश झालात असा सवाल उपस्थित केला होता. यावर आता झिरवाळ यांनी उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने विधानसभेच्या उपसभापती नरहरी झिरवाळ यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस पाठवली होती. मात्र जिरवाडे यांनी शिंदे गटातील आमदारांची ही अविश्वास ठरावाची नोटीस स्वतःच फेटाळून लावली होती. नरहरी जिरवाळ यांच्या या निर्णयाबाबत सुप्रीम कोर्टाने त्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याची सूचना दिली होती. त्याचबरोबर त्यांनी किती आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसी पाठवल्या आहेत अशी ही विचारणा करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना झिरवाळ यांच्याकडून बाजू मांडण्यात आली की, मला आलेली ही अपात्रतेची नोटीस विधानसभा सदस्य नसलेल्या आयडीवरून आली होती त्यामुळे त्यांनी ती फेटाळून लावली. असे जिरवाड यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेला जवळपास वर्षभर सभापती नव्हते. काँग्रेस नेते नाना पटोले हे पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष झाल्यानंतर २०२१ पासून हे पद रिक्त होते. त्यामुळे उपसभापती नरहरी झिरवाळ महत्त्वाचे निर्णय घेत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्य व्हिप पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच अजय चौधरी यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. याशिवाय त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पक्ष सोडण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!