Share

औरंगाबादेत म्युकरमायकोसिसने घेतला ‘एवढ्या’ रुग्णांचा बळी!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गातून बाहेर आलेल्यांना म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. शहरात दीड महिन्यात या आजाराचे २०१ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले. त्यातील १६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोना झालेल्यांना नवी चिंता सतावत आहे.

कोरोना संसर्गाची आत्तापर्यंत शहरातील सुमारे ८३ हजार नागरिकांना बाधा झाली. यातील सतराशे जणांचा मृत्यू झाला. ८१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेली. पण ज्यांना कोरोनाचा जास्त त्रास झाला त्यांना आता म्युकोरमायकोसिसचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील खाजगी दवाखान्याकडून म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांबद्दल माहिती बद्दल मागविली होती. त्यानुसार शहरातील सहा हॉस्पिटलने माहिती पाठवली होती.

त्यात १ एप्रिल ते १५ मार्च दरम्यान म्युकोरमायकोसिस आजाराचे दोनशे एक रुग्ण दाखल झाले. त्यातच १६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. एमजीएम हॉस्पिटल मध्ये ७६,एशियन हॉस्पिटल मध्ये २४,कमलनयन बजाज हॉस्पिटल मध्ये ५, धूत हॉस्पिटल मध्ये तीन, अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये ४३ तर घाटी रुग्णालयात पन्नास रुग्ण दाखल झाले आहेत. यापैकी मधुमेही रुग्णांची संख्या ७६ ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या ११० स्टेरॉइडचे रुग्णांची संख्या १४८ होती. एका रुग्णाला एका पेक्षा जास्त व्याधी असलेल्यांचा देखील यात समावेश आहे. सध्या सात जणांवर उपचार सुरू आहेत.

शहरात म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले. याविषयी तर्कवितर्क सुरू होते. त्यावर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी रुग्णालयाकडून अधिकृत माहिती मागविण्याच्या सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी रुग्णालयाकडून अधिकृत माहिती मागविण्याच्या सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना केल्या होत्या. आता खासगी रुग्णालयांनी म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांची माहिती दररोज पाठवावी, अशा सूचना रुग्णालयांना करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!