औरंगाबाद : कोरोना संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे तातडीने अॅण्टिजेन आणि आरटीपिसीआर टेस्ट करण्यासाठी ३९ खासगी प्रयोगशाळांना मनपाने परवानगी दिली आहे. मात्र, १५ लॅब चालकांनी एकही अॅण्टिजेन, आरटीपिसीआर टेस्ट केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून १५ लॅबला कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविड-१९ तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी अधिकतम विक्री मुल्य निश्चित करण्याबाबत ६ डिसेंबर २०२१ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयानुसार महापालिकेकडून शहरातील ३९ खासगी प्रयोग शाळा (लॅब) चालकांनी अॅण्टिजेन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी परवानगी घेतली. त्यासाठी रुग्ण स्वत:हून लॅबमध्ये तपासणीसाठी आल्यास १०० रुपये फीस, तपासणी केंद्रावरुन नमुने घेतल्यास १५० रुपये, रुग्णांच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास २५० रुपये या प्रमाणे फीस आकारण्याची सूचना महापालिकेने केली.
कोविड-१९ च्या अॅण्टिजेन, आरटीपीसीआर करण्यासाठी सुधारीत दर आकारण्यात आले आहेत. मात्र, परवानगी घेतल्यानंतरही खासगी लॅब चालकाकडून कोविडची अॅण्टिजेन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. ३९ खासगी लॅबपैकी २४ लॅब चालकांनी रुग्णांची अॅण्टिजेन, आरटीपीसीआर केली. मात्र, १५ लॅबचालकांनी एकाही रुग्णाची अॅण्टिजेन व आरटीपीसीआर केली नाही. त्यामुळे या लॅबचालकांना परवानगी रद्द का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
या आहेत खासगी प्रयोगशाळा
एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिल्ट्री हॉस्पिटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदिरजवळ, गणेश लॅबोरेटरी सर्विसेस पुंडलीकनगर, ओरीयन सिटी केअर हॉस्पिटल गुरुगोविंदसिंगपूरा, अमृत पॅथालॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम लाडली हॉटेलजवळ, युनिसेफ पॅथालॉजी लॅब, भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-२.
महत्वाच्या बातम्या:
-
नायलॉन मांजामुळे ‘करकोचा’ने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात झाले अंत्यसंस्कार!
-
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “प्रत्येकाने…”
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू

