बीड: काँग्रेस खासदार तसेच शांत स्वभावाचे नेता अशी ओळख असलेले राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
काँग्रेस नेते खा.राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता दु:खद आहे.सभागृहात विविध विषयांवर लक्षवेधी भूमिका मांडणारे अभ्यासू सदस्य म्हणून सलग चार वेळा त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते, अशा भावना मुंडे यांनी सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. माझ्या पहिल्या संसदीय कार्यकाळात राजीव सातव यांनी पक्षविरहित दृष्टिकोनातून मला अनेक वेळा मार्गदर्शन केले, अशी एक आठवण देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या निधनाने आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी सातव कुटुंबियांप्रति संवेदना या वेळी त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मागील २३ दिवसांपासून राजीव सातव आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.
महत्वाच्या बातम्या
- ‘काळाने माझा भाऊ हिरावून घेतला..’, नाना पटोले भावनिक
- राजीव सातव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला सायटोमॅजिलो व्हायरस म्हणजे काय?
- भारताचे माजी क्रिकेटपटु राजेंद्रसिंह जडेजा यांचे कोरोना संसर्गामुळे निधन
- ‘आता पुढचा मोर्चा सरकारला सळो की पळो करून सोडणारा’, आ. मेटे
- तेथून बाहेर पडण्यासाठी मला पोलीस बोलवावे लागले ; सेहवागनं सांगितला अविस्मरणीय किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

