मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, सध्या अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे.
अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये. त्याशिवाय ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली आहे. तसेच सध्या प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.
दरम्यान हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाचा वेग वाढत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ताशी 150 ते 180 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. सध्या यामुळे किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सातव यांनी अनेक वेळा मार्गदर्शन केले…’, प्रीतम मुंडेंच्या भावना
- ‘एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला’, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भावना
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

