औरंगाबाद : मराठा समाजाचे जे आरक्षण रद्द झाले त्याला मराठा आमदार व खासदार सर्वस्वी जबाबदार आहेत असा आरोप मराठा समाजातील युवकांनी केलाय. त्यामुळे समाजातील काही तरुणांनी एकत्र येऊन सिल्लोड तालुक्यातील निल्लोड धरणात मराठा आमदार-खासदारांच्या नावे शनिवारी विधिवत पूजा करून दशक्रिया व पिंडदान केले. या वेळी ‘एक मराठा लाख मराठा’ आशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. त्याला कारणीभूत असलेले मराठा आमदार व खासदार हे मराठा समाजाच्या मते ५ मे रोजी दगावले. या सर्व आमदार-खासदारांना समाजातील अनेक लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. कोरोनामुळे त्यांचा अंत्यविधी करता आला नाही. या आमदार-खासदारांनी आरक्षणासंदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही किंवा पाठपुरावादेखील केला नाही.
याचा राग व्यक्त करत श्रद्धांजली दिल्यापासून १० दिवस पूर्ण झाले म्हणून त्यांचा मराठा समाजातील काही तरुणांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे दशक्रिया विधी करत पिंडदान केले. त्या वेळी या तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी देत एक होण्याची समाजातील सर्व घटकांना विनंती केली. तसेच १८ मे राेजी प्रत्येक घरात तेराव्याचे गाेड जेवण करावे असे आवाहनही तरुणांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- राजीव सातव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला सायटोमॅजिलो व्हायरस म्हणजे काय?
- ‘एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला’, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भावना
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

