औरंगाबाद : टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलातील तेवीस गाळेधारक वारंवार विनंती करूनही पैसे भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मनपाने आता या गाळ्यांचा वाटप करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच गाळ्यांसाठी भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. महापालिकेने सहा वर्षांपूर्वी टीव्ही सेंटर चौकात व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला.
मोक्याची जागा आणि व्यापाऱ्यांनी गाळे बुकिंग केले होते त्यामुळे पालिकेला त्यावेळी कोट्यवधी रुपयांचा नफा झाला होता. पुढे व्यापारी संकुलाचे काम अनेक वर्षे रखडले होते. काही महिन्यांपूर्वी व्यापारी संकुलाचे काम पूर्ण झाले. काही व्यापार्यांना गाळे मिळाल्याने दुकानेही सुरू झाली. मात्र व्यापारी संकुलातील धारकांकडून उर्वरित रक्कम भरण्यास विलंब होत होता. यामुळे पालिकेने वारंवार नोटिसा बजावल्या.
परंतु व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अखेर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार हे गाळे वाटप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. या गाळ्यांसाठी भरलेली अनामत रक्कमही जप्त केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या व्यापारी संकुलात एकूण ५३ गाळे आहेत. इतरांनी पैसे भरलेले असून २३ गाळ्यांची रक्कम थकली आहे. त्यामुळे पैसे न भरणाऱ्या तेवीस जणांचे वाटप रद्द करून पुन्हा नव्याने लिलाव केला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजीव सातव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला सायटोमॅजिलो व्हायरस म्हणजे काय?
- दिलासादायक! बीडमध्ये रुग्णसंख्येत होतीये घट
- भारताचे माजी क्रिकेटपटु राजेंद्रसिंह जडेजा यांचे कोरोना संसर्गामुळे निधन
- ‘आता पुढचा मोर्चा सरकारला सळो की पळो करून सोडणारा’, आ. मेटे
- तेथून बाहेर पडण्यासाठी मला पोलीस बोलवावे लागले ; सेहवागनं सांगितला अविस्मरणीय किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

