नॉर्थ कोरिया : संपूर्ण जग हे कोरोना महामारीचा सामना गेले २ वर्ष करत आहे. अनेक देशात कोरोनाचा प्रकोप जास्त जाणवला त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांनी आपले जवळचे गमावले. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळतो. या मधील एक देश नॉर्थ कोरिया सुद्धा याच परिस्थितीचा सामना करताना दिसतो आहे.परंतु येथील समस्या थोडी वेगळी आहे.
नॉर्थ कोरिया मध्ये सध्या उपासमारीची गंभीर समस्या उद्भवली आहे. त्या देशातील अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपायामुळे आणि त्या देशाचे इतर देशातील बिघडलेल्या संबंधामुळे या देशाची ही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे अनेक लोक आत्महत्येच्या दिशेने आपले पाऊल टाकतांना दिसत आहेत.
डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाने कोरोनाचा सामना करण्यासाठी देशाच्या सर्व सीमा बंद केल्या. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असून देशात आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय पुरवठ्याचा अभाव आहे. त्या देशातील अनेक तरुण आणि वृद्ध लोकांना आज उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. तसेच त्या देशात अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे असा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल सांगतो.
मध्यंतरी त्या देशाने अनेक अण्वस्त्र चाचण्या घेण्याचा सपाटाच लावला होता. अमेरिकेसहित इतर देशांनी त्यांना अण्वस्त्र चाचण्या घेऊ नये असे सांगून सुद्धा कोरियाने चाचण्या घेतल्या. त्या देशाचा हुकुमशहा किम जौंग उन हा नेहमी चर्चेत असतो. मध्यन्तरी तो कोणत्याच कार्यक्रमात उपस्थित नसायचा त्यामुळे तो नेमका कुठे गेला त्यावरून त्या देशात चर्चा सुरु होती परंतु तो काही दिवसांनी परत आल्याने सर्व चर्चाना विराम मिळाला.
महत्वाच्या बातम्या
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- ‘दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण…’, संजय राऊतांचा घणाघात
- औरंगाबादेत प्रत्येक वॉर्डात पालक अधिकारी; आतातरी समस्या सुटतील का चुटकीसरशी?
- सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडेच; मनसेचे शिवसेनेला सडेतोड उत्तर
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- ‘कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही’


