🕒 1 min read
मुंबई: आपल्याच पक्षातील नेत्यांनी मोठा धक्का देत शिवसेनेला मोठी जखम दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का पचवणे अत्यंत कठीण गेले. एकनाथ शिंदे यांनी बंडाला सुरुवात केली आणि एकापाठोपाठ अनेक नेत्यांनी सेनेशी पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणजे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले. “आपल्याच माणसांनी पाठीवर घाव देत पुढची पायरी गाठली”, अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळाली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हीच परिस्थिती अधोरेखित करणारे ट्वीट केले आहे. सध्या ते चर्चेत आहे.
“नेमके हेच घडले!”, असे म्हणत संजय राऊत यांनी एक व्यंगचित्रही पोस्ट केले आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल (२९ जून) रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
नेमके हेच घडले! pic.twitter.com/nNkBXNAzB3
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 30, 2022
शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ram Satpute : “मनोरुग्ण संजय राऊतांच्या मार्गदर्शनात असणारं सरकार गेलं”, ‘भाजप’चा टोला
- Amol Mitkari : “महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा
- Raju Shetti : “ईडीच्या वादळात तुमचा अख्खा वाडा उद्धवस्त…”, राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला टोला
- Governor : राज्यपाल कोश्यारींनी केले ‘विशेष अधिवेशन’ स्थगित; महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा
- Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
