🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडाने आज राज्यातील ठाकरे सरकार कोसळले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाल्याचे भाजपकडून सतत म्हटले जात आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल (२९ जून) रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला. यानंतर भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनी थेट संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला.
“मनोरुग्ण संजय राऊतांच्या मार्गदर्शनात कार्यरत असणार सरकार गेलं, आता लोकनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा विकासाची महाराष्ट्र घोडदौड करणार.”, असे ट्वीट राम सातपुते यांनी केले आहे.
मनोरुग्ण @rautsanjay61 च्या मार्गदर्शनात कार्यरत असणार सरकार गेलं ..
आता लोकनेते @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वात पुन्हा विकासाची महाराष्ट्र घोडदौड करणार .. #Maharashtra— Ram Satpute (@RamVSatpute) June 29, 2022
दरम्यान शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari : “महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा
- Raju Shetti : “ईडीच्या वादळात तुमचा अख्खा वाडा उद्धवस्त…”, राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला टोला
- Governor : राज्यपाल कोश्यारींनी केले ‘विशेष अधिवेशन’ स्थगित; महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा
- Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार
- Political Crisis : बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना १४९ ची नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
