मुंबई: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल (२९ जून) रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी थेट भाजपवर निशाणा साधत टीका केली.
“आज महाराष्ट्राने एक उत्तम व सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला. याची नोंद तरुणांच्या हृदय पटलावर कायम राहील महाराष्ट्राच्या जनमनात कायमचे स्थान मिळवणाऱ्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यास मनापासून दंडवत.”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र!एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जनता शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना कधीच विसरू शकणार नाही. कोरोना सारखी संकट, चक्री वादळ पेलणारे आपण,आज इतकेच सांगतो महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील. pic.twitter.com/N42DDEH9yn
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 29, 2022
तर पुढच्या ट्वीटमध्ये मिटकरी यांनी म्हटले कि, “जय महाराष्ट्र! एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जनता शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना कधीच विसरू शकणार नाही. कोरोना सारखी संकट, चक्री वादळ पेलणारे आपण, आज इतकेच सांगतो महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील.”, असा टोला मिटकरी यांनी भाजपला लगावला.
दरम्यान शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Raju Shetti : “ईडीच्या वादळात तुमचा अख्खा वाडा उद्धवस्त…”, राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला टोला
- Governor : राज्यपाल कोश्यारींनी केले ‘विशेष अधिवेशन’ स्थगित; महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा
- Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार
- Political Crisis : बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना १४९ ची नोटीस
- Sanjay Raut : आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांच भावुक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

