औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद शहरामध्ये जाहिर सभा होत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी कर्ली होती. औरंगाबादमध्ये गावागावात बैठका घेत शिवसेनेने शक्ती पणाला लावली होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा झाली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिलेले आहे. या सभेत शिवसेना शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यभरातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये या सभेसाठी दाखल होत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर अधिक आक्रमक होत भूमिका मांडली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. इथे पाणी प्रश्न जटिल असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता शहरासाठी निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे.” उद्धव ठाकरे पाणी प्रश्नावर अधिक आक्रमक झंझाले आहेत.
“आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी भाजपने शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर आम्ही तेही करू शकतो. मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- सलमान खान धमकी प्रकरण, लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस पोहचले दिल्लीत
- मिताली राजने विश्वचषकात पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजांचे उडवले होते छक्के; वाचा!
- Aurangabad : मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेपूर्वीच राडा; पाणी प्रश्नांवर निवेदन देणाऱ्या भाजप नेत्यांना अटक
- ‘या’ तारखेनंतर धो-धो बरसणार मान्सून; वाचा सविस्तर माहिती
- शिवसेनेच्या मंचावर संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा; शालिनी ठाकरेंनी म्हटले होते, “पुतळा स्टेजवर आणून ठेवतील पण…”


