मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ च्या बाहेर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं होत. यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. या वादात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे सामील झाले आहेत.
यासह “राणा पती-पत्नीच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. राज्यातील सरकारच वातावरण बिघडवत आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे, याची माहिती आहे की नाही? सत्ताधारी नेतेच धमक्या देऊ लागली राज्यात पोलीस यंत्रणा आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो, असेही नारायण राणे म्हणाले.
राणा दाम्पत्यांना अटक –
युवा सेनेने राणा दाम्पत्य यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आता नवनीत राणा व रवी राणा यांना या तक्रारीवरून अटक झाली आहे. पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते आणि त्यांच्या घरातून राणा दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. राणा दाम्पत्य आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. राणा यांनी वारंटची मागणी करत, हाय वोल्टेज ड्रामा केला. दरम्यान पोलीस आणि राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.
महत्वाच्या बातम्या –


