Share

“संजय राऊत यांना मी खासदार केलं होतं” – नारायण राणे

Published On: 

मुंबई : रविवारी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. देशासाठी काम केलेल्या व्यक्तीला या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षाचा हा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला आहे. हाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. मोदींचा हा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आमची भूमिका मागे घेत आहोत, असं रवी राणा यांनी सांगितले.

तसेच नवनीत राणा व रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता या तक्रारीवरून राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरु होती. या पत्रकार परिषदेत राणे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी राऊतांवर देखील निशाणा साधला आहे.

राणे म्हणाले की, “संजय राऊत याला मी खासदार केलं होतं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, त्यांच्या शिफारसीवर राऊत यांना राज्यसभेत खासदार केलं. सामना सुरू झाला तेव्हा हा संजय राऊत आला होता. आता थोड्याच दिवसात ईडी संजय राऊतांच्या तोंडात विडी देईल’, अशी टीकाही राणेंनी केली. तसेच भाजपाला धमक्या देवू नका कोण ही घाबरत नाही. धमक्या द्यायची हिंमत ताकद कोणाच्यात नाही. राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागेल अशी परिस्थिती आहे”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!