Share

किरीट सोमय्या घेणार राणा दाम्पत्याची भेट!

Published On: 

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आता अटकेत असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याची भेट घेणार आहेत. युवा सेनेने राणा दाम्पत्य यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आता नवनीत राणा व रवी राणा यांना या तक्रारीवरून अटक झाली आहे. पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. आणि त्यांच्या घरातून राणा दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. आता भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याच्या पाठीशी आले आहेत. आपण रात्री
९.३० च्या दरम्यान राणा या दाम्पत्याची भेट घेणार आहोत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

तसेच किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे व महाविकासआघाडी सरकार वर टीका केली आहे. हनुमान चालीसा ला विरोध फक्त रावण सरकारच करू शकते अशा शब्दात टीका सोमय्या यांनी केली. ठाकरे सरकारला भीती नवनीत राणांची आहे की, हनुमान चालीसा मुळे सरकारला आग लागली आहे, असा सवाल सोमय्या यांनी केला. या माफिया सरकारचं पतन निश्चित आहे.

दरम्यान मुंबईतील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळाले होते. आज कलानगर भागातील मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती तर राणा दाम्पत्यांच्या खारमधील घराबाहेर देखील शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. अखेर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!