अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ,संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांची बंडाळी मोडून काढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी ची मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसैनिकांचे अनेक मेळावे घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज अलिबाग मध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर निशाणा साधत टीका केली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही हट्ट धरला होता. हे तीन पक्षांचे सरकार आणण्यासाठी सोनिया आणि गांधी शरद पवार यांनी एक संयमी नेता हवा असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना नेतृत्व करायला सांगितलं होतं. आज जे लोक भाजपसोबत जाण्यासाठी हट्ट करत आहेत त्यांचे मुख्यमंत्रीपद भाजप मुळेच गेलं.
भाजपने शब्द मोडला त्यामुळेच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. त्यांनी शब्द पाळला असता तर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते. उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांचचं नाव होतं पण ज्यांच्या मुळे तुमचं पद गेलं त्यांच्यासोबत आज तुम्ही युती करण्यासाठी सांगत आहात असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
त्यानंतर संजय राऊत म्हणाले बरं ठीक आहे ,आम्ही महाविकास आघाडी मधून बाहेर पडू पण मग तुम्ही मुंबईत या, उद्धव ठाकरे यांच्या समोर येऊन तुमचं संख्याबळ दाखवा आणि बाजू मांडा. पण तुम्ही येणार नाही, तुमच्यात हिंमत नाही. तुम्हाला बंदिस्त करून ठेवले आहे. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, तुम्ही श्वास घेऊ शकत नाही, तुम्ही कुठेही फिरू शकत नाही. तुम्ही त्या हॉटेलमध्ये कैदी म्हणून राहत आहात. तुम्हाला तुमच्या खोलीच्या बाहेर येऊ दिलं जात नाही. तुम्हाला गुलाम बनवून ठेवला आहे तिकडं. अशी गुलामी शिवसेना करू शकत नाही असा टोला संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

