Share

धनगर बांधवांच्या पाठीशी मी नेहमीचं खंबीरपणे उभी राहिले : पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : धनगर बांधवांच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभी राहिले आहे. त्यांच्या घोंगडी व काठीत मायेची उब आणि शक्ती सामावलेली आहे, असे म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनी मनोगत व्यक्त केले. मुंबई येथील शिवाजी पार्कवर रासपचा महा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. त्यावेळी मुंडे बोलत होत्या.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनगर बांधवांच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहिले आहे, त्यांच्या घोंगडी व काठीत मायेची उब आणि शक्ती सामावलेली आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना मंत्री करण्याचा आपण शब्द दिला होता तो पूर्ण केला. ते आज दुग्धविकास मंत्री आहेत.

तसेच धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मंत्रालयाची पायरी चढू शकणार नाही असे मी म्हणाले होते आणि त्यानंतर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आदिवासींच्या सवलती व कोट्यवधीचे बजेट सरकारने दिले, तथापि सत्तर वर्षे ज्या काॅग्रेस- राष्ट्रवादीने आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले, त्यांनी मात्र काहीही केले नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.

दरम्यान या कार्यक्रमाला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. राहूल कुल, शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, सिने अभिनेत्री सपना बेदी, युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड आदी यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!