टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार गळती लागली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर यांनी पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आता कोकणात राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणारे भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
भास्कर जाधव यांनी शिवसेना प्रवेशासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. जाधव यांच्या प्रवेश झाल्यास कोकणात राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसणार आहे.
भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची याआधीही शक्यता वर्तिविली जात होती. लोकसभा निवडणुकीपासुन जाधव राष्ट्रवादीमध्ये सक्रिय दिसत नाहीत, त्यामुळे ते पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा केली जात होती. आज उद्धव ठाकरे यांचये भेटीमुळे लवकर ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

