टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअयमध्ये उत्तर भारतातील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्लीचे भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे.
भाजपची सध्या सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे. या अंतर्गत सपना चौधरी भाजपमध्ये सामिल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सपना चौधरी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु आता अधिकृतपणे सपनाने भाजपात प्रवेश केला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत त्या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Haryanavi dancer Sapna Chaudhary joins Bharatiya Janata Party at the party's membership drive program in Delhi. pic.twitter.com/G9jmj0tOrt
— ANI (@ANI) July 7, 2019
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपचा प्रचार केला होता. तेव्हापासून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

