Share

Dhananjay Munde | “भाजपने दहा जन्म घेतले तरी…”, रोहित पवारांनी ‘तो’ आरोप करताच धनंजय मुंडे देखील कडाडले

Published On: 

🕒 1 min read

Dhananjay Munde | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सध्या तुफान चर्चेत आहेत. काही दिवसांपुर्वीच त्यांनी भाजप पक्षावर आरोप केल् होता. यानंतर आता बारामती अॅग्रो लिमिटेडची चौकशी होणार आहे. अशातच रोहित पवार (Rohit Pawar )यांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया देत भाजप (BJP) पक्षावर टीकेचा बाण सोडला आहे.

शिवसेना पक्षानंतर भाजप आता राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. देशभरातील प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांनी अनेकदा राष्ट्रवादी फोडण्याचा देखील प्रयत्न केला, असं म्हणत मात्र राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील, तरी देखील त्यांच उद्दिष्ट साध्य होणार नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

यादरम्यान, त्यांना पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देत पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यांची पुन्हा काम करण्याची इच्छा आहे का? असं त्यांना विचारायला हवं, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यावरून शिंदे सरकारवर टीका झाली. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना संधी मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना स्थान मिळू शकतं. यात पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!