Share

Chandrasekhar Bawankule | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? बावनकुळेंनी सांगितली आकडेवारी

Published On: 

🕒 1 min read

Chandrasekhar Bawankule |  मुंबई : भाजपा आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबाची शिवसेना पक्षासोबत युती करून लढवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची अफाट लोकप्रियता, त्याच्या सरकारचे काम, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचे काम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आम्ही यश मिळवू, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी किमान ४५ जागा व विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागावर आम्ही यशस्वी होऊ. आमच्या विरोधात तीनही पक्ष एकत्र आले तरी आम्ही विजय मिळवू, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी ही वैचारिक आधारावर नव्हे तर केवळ भाजपाला दूर ठेऊन सत्ता मिळविण्यासाठी निर्माण झाली. पण विचार सोडल्यामुळे आता पारंपरिक मतदार दुरावण्याच्या भितीने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शिवसेनेवर टीका करत आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

राहुल गांधी याची यात्रा त्या पक्षातील नेत्यानी ‘हायजॅक’ केली-

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर देखील टीका केली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षातील कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी कॉंग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी याची यात्रा त्या पक्षातील नेत्यानी ‘हायजॅक’ केली असून त्याच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) त्या पक्षातील नेत्याचा कब्जा आहे. ते कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना भेटू देत नाहीत. परिणामी या यात्रेमुळे त्यांचा पक्ष वाढण्याच्या ऐवजी कमकुवत होत आहे. अन्य पक्षातील नेते कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीत. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. नंदुरबारच्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आजच भाजपामध्ये प्रवेश केला. २०२४ ची आगामी निवडणूक येईपर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!