🕒 1 min read
Dhanajay Munde | मुंबई : मंत्री मंडळ विस्तारावरुन पंकजा मुंडे भाजप पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच येत्या मंत्री मंडळ विस्तारात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पद मिळणार असल्याचं म्हटलं जातं आहे. याचपार्श्वभूमीवर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी वक्तव्य केलं आहे.
याबाबत बोलताना, मंत्रिमंडळाची दुसरी यादी जाहीर होणार असून पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यांची पुन्हा काम करण्याची इच्छा आहे का? असं त्यांना विचारायला हवं, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यावरून शिंदे सरकारवर टीका झाली. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना संधी मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना स्थान मिळू शकतं. यात पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली अजून पंचनामे झाले नाहीत. सर्वात जास्त फटका विदर्भ-मराठवाड्याला बसलाय. गेल्या वर्षीही अशी परिस्थिती झाली होती. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, शिंदे सरकारनेही मदत केली पाहिजे, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | रोहित पवार येणार अडचणीत?, साखर आयुक्तांसहित बारामती ॲग्रो लिमीटेडची होणार उच्चस्तरीय चौकशी
- Rohit Pawar | भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यावरून रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले…
- T20 World Cup | “रोहितला लोखंडी शूज बनवायला सांगा” ; आफ्रिदीची घातक गोलंदाजी, नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव
- Bhaskar Jadhav | “आपण यांना पाहिलंत का?”, मुंबईमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात विरोधकांची बॅनरबाजी
- Eknath Shinde | “आता पवार आणि शेलार पॅनल देखील ‘या’ स्पर्धेत उतरले असून…”, एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
