मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची धमकी दिल्याने या राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 24 एप्रिल रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान, खासदार नवनीत राणा १२ दिवसानंतर तुरुंगाबाहेर आल्या आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना काल म्हणजेच बुधवारी जामीन मंजूर झाला होता. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे राणा दाम्पत्याला बुधवारी जेलमध्येच राहावं लागल होत. आता सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर नवनीत राणा जेल बाहेर आल्या आहेत. जेलमधून बाहेर येताच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवनीत राणा यांच्यानंतर त्यांचे पती नवनीत राणा यांची देखील तळोजा कारागृहातून सुटका झाली आहे. त्यानंतर रवी राणा यांनी लीलावती रुग्णालयात पत्नी नवनीत राणा यांची भेट घेतली. यावेळी नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते.
नवनीत राणा यांची गेले अनेक दिवस मान दुखत असल्याची तक्रार केली होती. जेलमधल्या जमिनीवर झोपावे लागल्याने त्यांना मानदुखीचा त्रास झाला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

