मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा एका रोमांचक वळणावर पोहोचली आहे आणि आज स्पर्धेचा ५०वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादकडून कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि सीन एबॉट हे पदार्पणाचा सामना खेळत आहेत. तर दिल्लीने एनरिक नॉर्किया, मनदीप सिंग, रिपल पटेल आणि खलील अहमद आजचा सामना खेळत आहेत. नऊपैकी चार सामने जिंकून दिल्लीचा संघ सातव्या तर हैदराबाद संघ नऊ पैकी पाच सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे.
दिल्ली कॅपिटल्सला आपल्या कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. अनेक सामन्यांमध्ये संघाला जवळच्या प्रसंगी पराभव पत्करावा लागला. गेल्या दोन सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ या जोडीला चांगली सुरुवात करता आलेली नाही. मात्र, शेवटच्या सामन्यात मिचेल मार्शने ज्या आक्रमक पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे संघाला दिलासा मिळाला असेल. कर्णधार ऋषभ पंतला जबाबदारीने सामना संपवण्याची गरज आहे.
???? Toss Update ????@SunRisers have elected to bowl against @DelhiCapitals.
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/11uq5iR8Gv
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
सनरायझर्स हैदराबादने सलग पाच विजय मिळवून शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत. संघाच्या फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अभिषेक शर्माने टॉप ऑर्डरमध्ये सातत्य दाखवले असून केन विल्यमसन पुन्हा लयीत येताना दिसत आहे. निकोलस पूरनने गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली होती आणि भविष्यातही त्याच्याकडून अशीच अपेक्षा असेल. गोलंदाजी आक्रमणाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे परंतु अलीकडील सामन्यांमध्ये एकसंध कामगिरी दिसून आली नाही.
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्किया.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

