Share

स्वप्नपूर्ती..! २२ वर्षाच्या पृथ्वी शॉनं मुंबईच्या ‘या’ भागात घेतलं घर; किंमत ऐकून बसेल धक्का!

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) भाग असलेल्या २२ वर्षीय पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने मुंबईतील वांद्रे भागात स्वतःचे घर विकत घेतले आहे. त्याच्या घराची किंमत १०.५ कोटी रुपये आहे. एका रिपोर्टनुसार, वांद्रे येथील एका अलिशान सोसायटीत पृथ्वीचे घर आठव्या मजल्यावर आहे. त्याच्या घराचे कॉर्पोरेट क्षेत्र २२०९ स्क्वेअर फूट आहे. त्याच्या घरात १६५४ स्क्वेअर फूट टेरेसही आहे. पृथ्वी शॉला त्याच्या नवीन घरासह तीन कार पार्क करण्यासाठी जागाही मिळाली आहे.

बातमीनुसार, २२ वर्षीय क्रिकेटर पृथ्वी शॉने पिरामिड डेव्हलपर्स आणि अल्ट्रा लाईफस्पेसकडून घर खरेदी केले आहे. पिरामिड डेव्हलपर्स आणि अल्ट्रा लाईफस्पेस हे या प्रकल्पाचे डेवलपर्स आहेत. पृथ्वी शॉने ३१ मार्च २०२२ रोजी या घरासाठी ५२.५० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. गेल्या महिन्यात म्हणजेच २८ एप्रिल २०२२ रोजी हे घर पृथ्वी शॉच्या नावावर करण्यात आले.

बातमीनुसार, पृथ्वी शॉच्या घराचा व्यवहार रेडी रेकनर आणि महाराष्ट्र सरकार मुद्रांक शुल्काच्या दरात वाढ होण्याआधी झाला होता. महाराष्ट्र सरकारने १ एप्रिलपासून राज्यातील मालमत्तांच्या रेडी रेकनर दरांमध्ये सरासरी ५ टक्के वाढ जाहीर केली आहे. सुधारित रेडी रेकनर दरांनुसार, ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक वाढ सरासरी ९.४८ टक्के असेल, तर बृहन्मुंबईमध्ये दर २.३४ टक्के वाढले आहेत. याशिवाय सरकारने मुंबईत मुद्रांक शुल्कावर एक टक्का मेट्रो उपकर देखील लागू केला आहे. यामुळे मालमत्ता संपादनाचा खर्च वाढला आहे.

पृथ्वी शॉ फेब्रुवारी २०१८ मध्ये अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याच वर्षी आयपीएल लिलावात त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आता दिल्ली कॅपिटल्स) १.२ कोटी रुपयांना विकत घेतले होते. सध्या तो आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो.

आयपीएल २०२२ मेगा लिलावापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला ७.८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. पृथ्वी शॉने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २८.७८च्या सरासरीने आणि १५९.८७च्या स्ट्राईक रेटने २५९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचाही समावेश आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत ५ कसोटी, ६ एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे ३३९, १८९ आणि शून्य धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीतही शतक आहे, जे त्याने पदार्पणाच्या सामन्यात झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!