मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची धमकी दिल्याने या दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या दाम्पत्याला २४ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राणा दाम्पत्याची आज तब्बल १२ दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी रूग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली.
दरम्यान, रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर रवी राणा आणि भाजप नेते किरीट सोमय्यांनी रूग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राणा यांचे तुरुंगातील अनुभव ऐकल्यानंतर मला इंग्रजांची आठवण झाल्याचे भाजप नेते किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. तसेच रवी राणादेखील मानसिकदृष्ट्य खचले असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.
नवनीत राणा यांची गेले अनेक दिवस मान दुखत असल्याची तक्रार केली होती. जेल मधून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा या आता वान्द्र्याच्या लीलावती रुग्णालयात गेल्या आहेत. जेलमध्ये जमिनीवर झोपावं लागल्यानं त्यांची मानदुखी बळावली होती. यानंतर आता नवनीत राणांनंतर, आता आमदार रवी राणा यांची देखील तळोजा जेलमधून सुटका झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

