Share

राजगर्जनेनंतर आता उद्धव ठाकरेंची धडाडणार तोफ, इम्तियाज जलील यांचीही सभेची घोषणा!

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा झाल्यानंतर, आता औरंगाबाद येथे शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची तोफ धडडणार आहे. येत्या ८ जूनला औरंगाबाद शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा आयोजित केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक ऐतिहासिक सभा शहरातील ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झाल्या, त्याच ठिकाणी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती.

मनसेच्या सभेवेळी हे मैदान तुडुंब भरलेलं होतं. आता शिवसेनेनेही याच मैदानावर सभा घेण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही सभेची तयारी सुरु केली आहे. मनसे, शिवसेना येथे लाखोची सभा घेऊ शकते तर आम्हीही मागे राहणार नाही. आम्हीही येथे सभा घेऊ. आम्हीही हे मैदान दुपटीने भरवू, असे इम्तियाज जलील म्हणाले.

८ जून १९८५ ला औरंगाबाद येथे मराठवाड्यातली पहिली शिवसेनेची शाखा स्थापन झाली होती. या शाखेच्या वर्धापनदिनाचं निमित्त साधून उद्धव ठाकरे यांच्या सभेचं औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या १४ मे ला मुंबईच्या बीकेसी मैदानावर उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यानंतर ८ जूनला औरंगाबाद येथे सभा होणार, असे संजय राऊत यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!