सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी 21 जिल्ह्यांत प्रवास करीत शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे दु:ख, वेदना समजून घेत, त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी यात्रा काढली.
त्यांच्या ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानाचा सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे समारोप झाला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक शब्दात जोरदार टीका केली आहे.