🕒 1 min read
पुणे: पुण्यातील ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं छाटली होती, त्या लाल महालात लावणीचे शुटिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टी असल्याने नागरिक पुण्यात कुटुंबाना घेऊन पुणे दर्शनासाठी येत असतात. परंतु यात पुणे महानगरपालिकेने पर्यटकांसाठी लाल महाल बंद ठेवला आहे. असं असतांना दुसरीकडे याच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारीत रिल्सचे शुटिंगचे करण्यात आल्याचं समोर आलं आहे याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
#पुणे मनपा प्रशासनाने लोकांना विश्वासात काम करणे गरजेचे..लाल महालातील नृत्य प्रकरणानंतर *विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे* यांनी प्रशासनाचे पत्र देऊन टोचले कान
या प्रकणात संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र@MahaDGIPR @ANI pic.twitter.com/K8ITtdnSDe— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) May 21, 2022
सध्या पुणे मनपावर प्रशासक आहे त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. स्वतः ची मनमानी कारभार थांबवा अशा सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहे. हे प्रकरण लक्षात आल्याने याबाबत चर्चा होत आहे असे किती गैरप्रकार घडत असतील याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने समिती करून या सारख्या पुण्यातील इतर वास्तूकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत. त्याचबरोबर यात दुर्लक्ष आणि कामचुकार करणाऱ्या वरिष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तर जे कोणी ठेकेदार आहेत त्यांचे कंत्राट रद्द करण्याची मागणी देखील डॉ. गोऱ्हे यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
डान्सर वैष्णवी पाटील यांनी प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर लावणी करतानाचा व्हिडिओ याठिकाणी शूट केला आहे. यावरून आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
डान्सर तरुणीवर गुन्हा दाखल-
दरम्यान लाल महालामध्ये लावणी नृत्य सादर करून ती प्रसारित केल्याने भावना दुखावल्याप्रकरणी वैष्णवी पाटीलसह चौघांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटाच्या भाष्य वादात अक्षय कुमारची एन्ट्री! म्हणाला…
- “सरकारला विरोधकांवर कुरघोडी करण्यावाचून…”, प्रवीण दरेकरांचा टोला
- ‘धर्मवीर’ चित्रपटाची पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई!
- IPL 2022 DC vs MI : बंगळुरू मांगे मुंबईचा विजय! काय आहे समीकरण? वाचा एका क्लिकवर…
- तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय?; सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
