🕒 1 min read
मुंबई: गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला लागलेल्या गळतीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“मी सामना वाचत नाही त्यामुळे त्यामध्ये काय लिहिलंय हे मला माहीत नाही. पण ज्यांच्याकडे बलिदान आणि विचार नाही अशा लोकांवर मला कुठलीही टिका करायची नाही. तसेच राजीवजी गांधी यांच्या बलिदानाच्याच दिवशी जर त्यांच्या विचाराचा मुडदा पाडण्याचे काम कोणी करत असेल तर तो सोबत राहून केलेला विश्वासघात ठरेल”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मी सामना वाचत नाही त्यामुळे त्यामध्ये काय लिहिलंय हे मला माहीत नाही. पण ज्यांचाकडे बलिदान आणि विचार नाही अशा लोकांवर मला कुठलीही टिका करायची नाही: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले pic.twitter.com/QFbdmTTUV9
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 21, 2022
नेमके काय म्हटले आहे सामनात?
काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून ‘गळती’ हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही, पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक’ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
२०२४ ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करीत असताना काँग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पुण्यातील लाल महालातील ‘त्या’ प्रकरणानंतर नीलम गोऱ्हे यांचे एकनाथ शिंदेंना पत्र; म्हणाल्या…
- बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटाच्या भाष्य वादात अक्षय कुमारची एन्ट्री! म्हणाला…
- “सरकारला विरोधकांवर कुरघोडी करण्यावाचून…”, प्रवीण दरेकरांचा टोला
- ‘धर्मवीर’ चित्रपटाची पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई!
- IPL 2022 DC vs MI : बंगळुरू मांगे मुंबईचा विजय! काय आहे समीकरण? वाचा एका क्लिकवर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
