🕒 1 min read
सोलापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्टाचा’ या यात्रेची सांगता सभा टेंभुर्णी येथे झाली. सदाभाऊ खोत यांनी २१ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडिंग, जादा ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, वीज बिल माफी,तसेच अतिवृष्टी, वादळ, पूर, दुष्काळ, रासायनिक खतांची टंचाई, खतांचे बोगस दर असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांसमोर ‘आ वासून’ उभे असताना सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे. अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष @Sadabhau_khot यांच्या 'जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्टाचा' या यात्रेची सांगता सभा टेंभुर्णी येथे झाली. सदाभाऊ खोत यांनी २१ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. (1/3) pic.twitter.com/O8GlUhdBWQ
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 21, 2022
तसेच सरकारला विरोधकांवर कुरघोडी करण्यावाचून वेळ नसेल, मात्र भाजपा बळीराजाच्या पाठीशी कालही होती आणि पुढेही भक्कमपणे उभी असेल. असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 DC vs MI : बंगळुरू मांगे मुंबईचा विजय! काय आहे समीकरण? वाचा एका क्लिकवर…
- तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय?; सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच पुण्यात शिवसेनेचा ‘बिग-शो’; मनसेचे २० पदाधिकारी बांधणार शिवबंधन
- “मी कुणाशीही गद्दारी केली नाही, शरद पवार यांचा मी…”; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
- शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस: खडसेंचे सेना आमदारावर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

