Share

जेवणाच्या ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरून मारहाण; तरुणाचा मृत्यू

Published On: 

सांगली : जेवणाच्या ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरून मारहाण झालेल्या ओंकार माने या पंचवीस वर्षीय तरुणाचा आज सकाळी सांगली येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओंकार माने हा मुळचा रा. औरवाड ता. शिरोळ. या घटनाप्रकरणी औरवाड या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

17 मे रोजी अनिमहंमद पटेल आणि ओंकार माने हे आलास येथील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी जेवणाच्या ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरुन ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार आणि कुलदीप संकपाळ यांच्याशी वाद झाला होता. दोन्ही गटाच्या हाणामारीत अनिम महंमद आणि ओंकार माने हे दोघे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी तिघा मारेकऱ्यांना अटक केली आहे.

ओंकारवर शस्त्रहल्ला झाल्याने त्याला उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले होते. आज २१ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास ओंकारचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजतात औरवाड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आलास आणि मारेकऱ्यांच्या घराजवळ बंदोबस्त वाढवला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!