🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ आणि कन्नड अभिनेता ‘किच्चा सुदीप’ या दोघांमध्ये भाषेचा वाद चालू आहे. यामध्येच आता अभिनेता अक्षय कुमारनेही एन्ट्री मारली आहे. दक्षिण विरुद्ध बॉलिवूड यावर बोलताना अक्षय कुमार म्हणाला, प्रादेशिक ब्लॉकबस्टरच्या तुलनेत बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत नाहीत.
अक्षय कुमार म्हणाला, “मला अशी आशा आहे की, अशी वेळ येईल जेव्हा प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. हे हिंदी चित्रपट उद्योगासाठी महत्वाच आहे. मला ‘दक्षिणेकडील उद्योग’ आणि ‘उत्तरेकडील उद्योग’ असं कोणी म्हणत तेव्हा राग येतो. माझा या विभागांवर विश्वास नाही. आपण सार्वजन एकाच विभागाचे आहोत यावर माझा विश्वास आहे.”
“आम्ही आमच्या इतिहासामधून काहीच शिकलो नाही. धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा फायदा ब्रिटिशांनीही घेतला, अस अक्षय कुमार म्हणाला. इंग्रजांनी आपल्यामध्ये फुट पाडली ह्या गोष्टी आम्हाला कधीच समजल्या नाहीत. जेव्हा आपल्याला आपण सर्वजन एक आहोत हे समजेल त्या दिवशी सगळ्या गोष्टी चांगल्या होतील,”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
