🕒 1 min read
चंद्रपूर : काल अखेर खासदार नवनीत राणा १२ दिवसानंतर तुरुंगाबाहेर आल्या आहेत. मात्र जेल मधून बाहेर येताच त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. नवनीत राणा यांची गेले अनेक दिवस मान दुखत असल्याची तक्रार केली होती. .यानंतर पुढे नवनीत रणांनंतर आमदार रवी राणा यांची देखील तळोजा कारागृहातून सुटका झाली. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांनी लावलेला गुन्हा न्यायालयाने काढून टाकला. ज्या पोलिसांनी हे केले, त्यांची जेव्हा केव्हा चौकशी होईल, तेव्हा या पोलिसांना तडीपार व्हावे लागेल, एवढे मात्र नक्की,” अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे
राणा दांपत्यावर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. त्यातच राणा दांपत्यानी सरकार विरोधात कट रचल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात १२४ (अ) अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता त्याबाबत कोर्टाने राणा दांपत्याला दिलासा दिला असून, राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे.
यानंतर आता राजकीय वर्तुळातून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होण्यास सुरवात झाली आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो ? असा सवाल पोलीस प्रशासनाला विचारला आहे. राजद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल केला जातो, हे पोलिसांना ठाऊक असायला हवे. पण राजा काहीही करू शकतो, तसेच सरकारही करू शकते, असेच म्हणावे लागेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
