Share

IPS कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली? वाचा काय आहे लेटरमध्ये…

Published On: 

🕒 1 min read

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संबंधी असलेल्या लेटर ने खळबळ उडवून दिली आहे. हे पत्रही एका पोलीस कर्मचाऱ्यानेच लिहिले असल्याचे या पत्रावरुन दिसून येत आहे. पण हे पत्र बनावट आहे असे संबंधित कर्मचाऱ्याने म्हंटले आहे. या पत्रात आहे काय? पाहूया सविस्तर…

आयपीएस कृष्णप्रकाश यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली आहे. त्यानंतर, ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते असे निदर्शनात आले होते. पण आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं पत्रावरील मजकुरातून स्पष्ट होत आहे. हे पत्र आपण लिहिलं नाही, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. हे पत्र खरे की खोटे? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या पत्रात आहे काय?

“मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले”, असे डोंगरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!