Share

“मनसेने परप्रांतीयांबद्दलची भूमिका स्पष्ट करावी,” सचिन अहिर यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एका बाजूला मराठी माणूस आणि हिंदुत्वाबद्दल भूमिका मांडायची. आता मनसेने परप्रांतीयांबद्दलची भूमिका मांडावी, अशी मागणी शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केली आहे. पहिले मशिदींवरचे भोंगे काढा, मग आम्ही काढू, असे होणार नाही. सर्वांनाच सामान कायदा लागू होईल, असे सचिन अहिर म्हणाले. अहिर हे पुण्यात बोलत होते. कायदा सर्वांसाठी समान आहे. जसे राणा दाम्पत्य असेल, अथवा अन्य कोणी त्या सर्वांना कायदा लागू होतो. तेव्हा कोणी चूक केल्यास कारवाई होणारच, असे सचिन अहिर यांनी सांगितले.

हिंदुत्व आणि राज ठाकरेंची भूमिका यावर त्यांनी सडकून टीका केली. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे राज्यात अनेक ठिकाणी काकड आरती आणि धार्मिक कार्यक्रमासाठी लाऊडस्पिकर लागले नाहीत. किंवा ते कार्यक्रम झाले नाहीत. काय मिळवले हे सर्व करून ? असा सवाल देखील सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे.

अजान हे ३० ते ४५ सेकंद असते, फारफार तर मिनिटभर असते, मात्र आपल्या आरत्या १५ मिनिटे किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ चालतात. एका अजानमुळे सर्व भोंगे बंद करायची वेळ आली आहे. त्यामुळे हिंदू सणांसाठी तो काळा दिवसच म्हणावा लागेल. या प्रकरणी सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गृहमंत्रालयाने आयबीकडून अहवाल घेतला आहे. या भोंग्यांच्या आडून धर्माधर्मात, जातीजातीत दंगली, काही तेढ निर्माण करत आहेत का? हे पाहत आहोत. कायदा सुव्यवस्था ठेवायची जबाबदारी आमची आहे. कायदा कायद्याचे काम करेल, असे सचिन अहिर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!