नवी दिल्ली : कर्नाटक येथील उडुपी येथील एका शासकीय पीयू महाविद्यालयात जानेवारी महिन्यात ६ मुस्लीम तरुणींना हिजाब परिधान करून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले. महाविद्यालचे गणवेशाबाबत धोरण असून त्या आधारे हा मज्जाव करण्यात आल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर या विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब परिधान करून वर्गात बसू न देणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ आणि २५ या अंतर्गत देण्यात आलेल्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे या याचिकेत म्हटले होतं. तसेच या प्रकरणी २६ याचिका दाखल झाल्या होत्या. यावर आज सुनावणी पार पडली. या प्रकरणावर दोन्ही न्यायाधीशांची दोन वेगवेगळी मते असल्याने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.
माझ्या मनात पहिला प्रश्न या मुलींच्या शिक्षणाचा आहे. आपण या मुलींचं आयुष्य काहिसं सुलभ करतो आहे का? मी कर्नाटक सरकारचा ५ फेब्रुवारीचा निकाल रद्द करतो. तसेच हिजाबवरील बंदी उठवावी असे आदेश देतो. या प्रकरणातील सर्व मुद्दे बिजोए इम्यान्युअल खटल्यात येतात, असं न्यायमुर्ती धुलिया म्हणाले.
तर दुसरीकडे न्यायमूर्ती गुप्ता यांनी आपला निकाल देताना ११ प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यावर भाष्य करत याचिका फेटाळल्या. हेमंत गुप्ता यांनी सर्व २६ याचिका फेटाळल्या. तसेच हिजाब इस्लाम धर्माच्या पंरपरांचा अत्यावश्यक भाग नसल्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी करणं योग्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, कोर्टाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसाच्या सुनावणीनंतर 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता. या दहा दिवसांच्या सुनावणीवेळी कोर्टाने याचिकाकर्त्यांची युक्तिवाद ऐकला.
महत्वाच्या बातम्या :
- Hizab Case | न्यायाधीशांचे एकमत नसल्याने हिजाब प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे
- Explained | ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्विकारण्यामागे भाजपचा डाव?
- Shambhuraj Desai | ‘निवडणूक आयोगाने झुकतं माप दिलं’, ठाकरे गटाच्या आरोपावर शंभूराज देसाई म्हणाले…
- Naresh Mhaske | “आधी मशालीचा उदो-उदो आणि आत्ता…”; ठाकरे गटाच्या पत्रावरुन नरेश म्हस्केंचा ठाकरे गटावर हल्ला
- Uddhav Thackeray | “तुम्ही शिंदे गटाला मदत केली”, १२ मुद्द्यांचं पत्र लिहित ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप


