मुंबई : अंधेरी (पूर्व) निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव आणि चिन्ह ‘ढाल-तलवार’ दिलं आहे. तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं आहे. परंतू यावरून अनेक तर्क-वितर्क काढले जात असल्याचं दिसून येतं आहे. अशातच ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला 12 मुद्द्यांचे पत्र लिहिले असून, त्यामध्ये निवडणूक आयोगाने निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने आयोगावर केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
काय म्हणाले नरेश म्हस्के ?
दोन दिवस मशालीच्या बाजूनं उदो-उदो केला, मिरवणुका काढल्या, उत्सव साजरा केला आणि आत्ता हे चुकीचं केल्याचं तुम्हाला वाटत आहे,असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे.
मशाल तुम्हीच मागितली होती, तुम्हीच जाहिराती केल्या. तुम्हीच छगन भुजबळांना बोलायला लावलं, म्हणत म्हस्केंनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. हा केवळ लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे. लोक दुधखुळी नाहीत, तुमची कार्यपद्धती लोकांच्या लक्षात आलेली असल्याचंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे गटाने पत्रात नेमकं काय लिहिलंय ?
ठाकरे गटाने पत्रामध्ये, आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने निर्णयात पक्षपातीपणा केला असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “तुम्ही शिंदे गटाला मदत केली”, १२ मुद्द्यांचं पत्र लिहित ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
- Yogesh Kedar | “चंद्रकांत पाटलांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, मराठा क्रांती मोर्चाचे योगेश केदार संतापले
- Neeraj Chopra | ‘मेरा वाला’ गाण्याच्या तालावर रणवीर सिंग सह नीरज चोपडाचे ठुमके
- Andheri By Elections | मशालवर निवडणुक लढणाऱ्या ऋतुजा लटकेंची माघार? पर्यायी नावंही ठरलं
- Flying Car | लवकर येणार आहे ‘ही’ Flying कार


