Share

Devendra Fadanvis | “… म्हणून सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत मी पोहचवणार आहे”, देवेंद्र फडणवीस

Published On: 

Devendra Fadanvis | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जोरात पेटला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हे सर्व माहिती ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना सांगणार असल्याचं म्हटलं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या संविधानाने कोणालाही कुठल्याही राज्यात जाण्याचा अधिकार दिलेला आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. राहण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे जर एखाद्या राज्यात याची पायमल्ली होत असेल, तर त्या राज्य सरकारने ते रोखण्याचं काम केलं पाहिजे आणि जर असं लक्षात आलं की राज्य सराकर रोखत नाही, तर निश्चित ते केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच, त्यामुळे आतातरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय ते घडतय की नाही हे आम्ही पाहतोय. यासोबत यासंदर्भातील सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत मी पोहचवणार आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!